Full description not available
P**E
Book Review
'द ग्रेटनेस माईंडसेट' हे पुस्तक म्हणजे एक आत्मचिंतन करायला लावणारं पुस्तक आहे. लुईस होवेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक, मराठीत प्रसाद ढापरे यांच्या सहजसुंदर भाषेत अनुवादित केलं आहे.हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं, की आपली खरी क्षमता काय आहे, आणि ती कशी जागृत करता येईल. अनेकदा आपण आपल्या मनात निर्माण झालेल्या भीती, शंका, आणि नकारात्मकतेमुळे मागे पडतो. पण हे पुस्तक त्या साखळदंडांना तोडायला शिकवतं. लुईस होवेस त्यांच्या अनुभवांतून सांगतात की महान होण्यासाठी तुमच्याकडे असामान्य कौशल्य असावं लागत नाही, तर एक सकारात्मक, चिकाटीची आणि उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी मानसिकता असावी लागते.पुस्तकात दिलेले उदाहरणं, आत्मनिरीक्षणाचे प्रश्न आणि सल्ले खूप उपयोगी पडतात. हे पुस्तक केवळ प्रेरणादायी नाही, तर वाचकाच्या आत डोकावून त्याला स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देतं. विशेषतः ज्या वाचकांनी अजूनही आपली दिशा ठरवलेली नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरू शकतं.
Trustpilot
2 days ago
5 days ago